STORYMIRROR

Madhuri Dashpute

Abstract Inspirational

3  

Madhuri Dashpute

Abstract Inspirational

उंबरठा माहेरचा

उंबरठा माहेरचा

1 min
7

माहेरचा उंबरठा ओलांडतांना

अश्रुंचा बांध सुटतो

घराच्या कानाकोपऱ्यात लपलेला

क्षण न क्षण हवाहवासा वाटतो!!


नकळत ओघळत जातात अश्रू

डोळ्यातून गालावर

कळत नाही कसे निघून जातात

हे विसाव्याचे दिवस भराभर!!


नजर फिरत असते घरभर

शोधत असते आपल्या खुणा

मग मन आठवून थबकते

आता झाल्या या वाटा जुन्या!!


कोपरा अन कोपरा घराचा

साद घालत असतो

कधी येशील फिरून पुन्हा

सारखं विचारत असतो?!!


जायचंच नसतं खरं तर तिलाही

पण घर कुठे आता तीच असत

सासुरवाशिनीच लेबल आता

नावावर तिच्या लागलेलं असत!!


सणासुदीला आता तेवढं माहेरपण

तीच उरलेले असत

चार दिवसाची पाहुनी होऊन

परतीच ठिकाण तीच ठरलेलं असत!!


सासर अन माहेरात अंतर खूप असत

दोघांतील जग हे वेगवेगळंच असत!


माहेरात नसते स्पर्धा

नसते कसली चढाओढ

सासरी करावी लागते कसरत

तरीही निघतच राहते खोड!!


नसतेच मुळी सासरला माहेराची सर

कारण माहेरी प्रेम अन जिव्हाळ्यासाठी

करावी लागत नाही धडपड!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract