STORYMIRROR

Madhuri Dashpute

Romance

3  

Madhuri Dashpute

Romance

तू रुपसखे

तू रुपसखे

1 min
163

यावी चिंब सरिंसारखी

अगदी अचानक अन अनपेक्षित

बिलगाव घ्यावं घट्ट मिठीत

अन हळुवार शिरावी कुशीत


मंद झुळूक वारा होऊन

स्पर्शून जावं तणाला

मोहरून टाकावं श्वासाने

फुलासारखं मनाला


मृदू मुलायम ओठांनी

चुंबून घ्यावी काया

उमटावी गाली गोड गुलाबी

रंगीत ओठांची छाया


असावे हे स्वप्न खरे

नसावा खट्याळ भास

रात्रंदिवस रुपसखे मज

जडे तुझाच ध्यास


होईल का हे स्वप्न खरे की

नुसताच वेडा भास?

होईल का पुरी या प्रेम दिलाची 

अल्लड वेडी आस?!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance