STORYMIRROR

Madhuri Dashpute

Abstract Others

3  

Madhuri Dashpute

Abstract Others

निरोप

निरोप

1 min
177

निरोप घेतो आता तुमचा

येतो पुढल्या साली

जायचंच नव्हतं मला

पण मातेची आठवण खूप आली!


सांगून आलो होतो

येईल दहा दिवसांनी परत

गेलो नाही तर ती बसेल

उगाच काळजी करत!


नाही करमत मला

आई अन बाबांविना

कस करमेल त्यांच्याविना?

कोणी कितीही झाला शहाणा!


लाडू मोदक तुम्ही मला

खूप घातले खाऊ

प्रेमाची उधळण इतकी की

कळत नाही कस जाऊ?!


पण आईला दिलेला शब्द

सांगा कसा मोडू?

तिच्या हातचा ही मला

खायचा असतो लाडू!


जातोय आता माघारी

येईल पुढल्या वर्षी

तरच तर म्हणाल ना

गणू येतो दरवर्षी!!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract