सांग भावा सांग
सांग भावा सांग
अंतर तूझ्या माझ्यातलं भावा
कमी कधी होईल का
पुसेल का ती कडू पाटी
शब्द नव्याने लिहिशील का ?
सुटेल का सारा गुंता
बसतील का नवीन गाठी
उलगडेल का कोडं सार
होईल का पुन्हा तेच नातं खरं?
जुळतील का पुन्हा सूर
की गातील शब्द बेसूर
अंतर होईल मायेच कमी
की आठवणी पळतील साऱ्या दूर?
बंधू माझ्या लाडक्या सांग
कधी माझ्यासवे बसशील का
पुन्हा एकदा फिरुनी नव्याने
पाहुनी मजला हसशील का?
उमलेलं का आठवणीनच फुल
पुन्हा एकदा नव्याने
पसरेल का सुगंध त्याचा
पुन्हा एकदा उमलण्याने?
सांग माझ्या पाठीराख्या
काळजी माझी घेशील का
विसरूनी सारे भांडण तंटे
पाठराखण ती करशील का?
अन सांग एकदा बंधू भावा
कोरी पाटी लिहीलं का
लाखमोलाची सुंदर अक्षरे त्यावर
पुन्हा लिहिशील का?
असेल जरी कधी दुःख संकटात मी
धावूनी तेव्हा येशील का
सरणावर जव जाईल जेव्हा
धाय मोकलूनी रडशील का?
सांग एकदा भावा माझ्या
सांग एकदा सांग??????!!!
