दगड
दगड
विषय निघाला म्हणून सांगतो
श्रीयुत दगडाच्या कृपेने
अचानक मला ठेच लागली
आणि मी शहाणा झालो
मग मी
दगडावर लक्ष केंद्रित केले
आणि दगडावर बोलू लागलो
तर त्यांनी वेड्यात काढले
आणि दगडही भिरकावले
जितके शक्य होते तितके झेलले
शेवटी मीच दगड झालो
आता त्यातील
काही भजतात, काही पूजतात
तर काही दूषणही देतात
पण जाऊ दे ना
आपल्याला काय करायचं आहे
शेवटी गणगोत्र एकच
तेही दगड आणि आपणही दगड
जगणेच अवजड
