असे नाही
असे नाही

1 min

253
तू वदावे अन् तसेच काही
घडेल असे नाही..
दिल्या वचनांचा तोच पाऊस
पडेल असे नाही..!!
किती घालशील वेडे
बांध मनास संयमाचे..
नयन पाकळ्यातले पाणी,
अडेल असे नाही..!!
चौकात बांधलेली अशी
कैक मंदिरे शोभिवंत
पण हरेक पत्थरावर जीव
जडेल असे नाही..!!
लपवू नकोस चंद्रमा
तू ओंजळीतल्या नभात..
तिमिरात दुःख प्रकाशित
दडेल असे नाही..!!
कशास अंथरतेस अशा
पायघड्या तू यातानांना..
वाटेवर फिरून पायधुळ
झडेल असे नाही..!!