थोडं मनात राहिलेलं
थोडं मनात राहिलेलं
पाऊस
केव्हाचा पडून गेलाय
अन् आभाळही
आता लख्ख झालेलं दिसतंय
मोहरली असशील ना तू?
आ हा!
नवा साजही लेवून घेतलेला दिसतोय।
कदाचित
तृप्तीची अनुभूती घेत असशील
कदाचित
सामावून घेण्याची क्षमताही संपली असेल
कदाचित
त्याची आवश्यकताही नसेल
पण तरीही,
धरली ओंजळ तू सोडू नको
बघ ना!
अजूनही काही झिरपते आहे
थोडं मनात राहिलेलं।