STORYMIRROR

काव्य चकोर

Classics

4  

काव्य चकोर

Classics

पहाट पावसाळी

पहाट पावसाळी

1 min
84


सरी मोत्यांच्या गुंफत

आली पहाट अंगणी..

पाखरांच्या ओठातील

झाली चिंब चिंब गाणी..!!


येई गवाक्षामधून

गार अवखळ वारा..

अंगाअंगास झोंबतो

थेंब थेंब निलाजरा..!!


गोड शहारा उठतो

अंगी रोमांच फुलतो..

सुमनांच्या देहातून

गंध वेडापिसा होतो..!!


पहाटेचा हा देखावा

भूल डोळ्यास पाडतो..

सृष्टीवर पावसाचा

जीव वेडापिसा होतो..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics