स्वप्नांची यादी
स्वप्नांची यादी


सर्व स्वप्नांची यादी
आता घडी करून ठेवलीय।
साकार तरी कुठे होतात स्वप्न
मात्र अडगळ वाढवून ठेवलीय।
तसे होते कधी कधी
एखादे अर्धवट स्वप्न साकार।
हात ना पाय त्याला
ना असतो कसलाच आकार।
पण आस जाता जात नाही
अन् यादी कमी होत नाही।
अडगळीच्या आयुष्याची
परवडीशिवाय बात नाही।
मग पहावी तरी कशाला
नुसती अडगळ वाढवणारी स्वप्न।
घड्या मोडून साऱ्या याद्यांची
वाटते फाडून टाकावी सारी स्वप्न।