पहाट उत्सव
पहाट उत्सव

1 min

422
सूर्याची लाली नभाच्या भाळी
सुवर्ण कांती किरण कोवळी।
धुक्याची चादर थंडीचा पदर
वारा घेतसे तान सुंदर।
नक्षत्र उतरले दवबिंदु झाले
धरेवर जणू नभ उतरले।
किलबिल पाखरे सुस्वर गाती
मंदिरात जशी घूमते आरती।
फुलांचे हास्य भुंग्याचे गुंजारव
मधु मिलनाचा हा भासावां उत्सव।