जागतिकीकरण
जागतिकीकरण


प्राॅम्प्ट ७
०७/०५/२०१९
कविता
शीर्षक:- जागतिकीकरण
सत् युगाची समाप्ती झाली, कलियुगाचा प्रारंभ झाला,
माणूस, माणूस न राहता स्वयंचलित यंत्र म्हणून जगू लागला...
गुहेत राहणारा मानव सदनिकेत राहू लागला,
कधीकाळी शिकार करणारा धान्य पिकवू लागला,
गारगोटीने आग पेटवणारा आज गॅस वापरू लागला,
सोन्याचांदीने मढणारा प्लॅटिनमकडे वळू लागला,
शिंपीकडली सत्ता रेडीमेड गार्मेंटवाला घेऊ लागला,
आदिमानव होता साधा भोळा,
ना ठाऊक होता त्याला पांढरा खडू ना काळा फळा
आता आई-टी वाल्या संगणकाचा त्याला लागलायं लळा,
पक्ष्यांसारखे पंख लावून तो आकाशी उडू लागला,
एका ग्
रहावरून दुसर्या ग्रहावरती वावरू लागला,
समुद्रतळी जाऊन जलचरांसमवेत विहरू लागला,
बैलगाडीला बैल जोडणारा मर्सिडीझ बेन्झमध्ये घुमू लागला,
पै पै नाणी मोजणारा इ-बॅन्कींग शिकू लागला,
साध्या राहणीमानवाला मॉल संस्कृतीला पुजू लागला,
हाताच्या कष्टांना घालून मुरड तो यंत्रांच्या आहारी जाऊ लागला,
माणुसकीच्या नियमांना विसरून मानवसंहार तो करू लागला,
युद्ध करण्याइतपत त्याची मजल गेली
अन् तो दिवसेंदिवस निर्दयी बनू लागला,
जागतिकीकरणाच्या ग्लोबल फॅशन शो मध्ये तो रमू लागला,
विज्ञानाचा मुखवटा घालून कर्मकांडाला दोष देऊ लागला,
समस्त मानवजात झाली जागतिकीकरणाची गुलाम,
एकविसाव्या शतकाच्या या गगनभरारीला सलाम !