STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Others

4  

Priyanka Shinde Jagtap

Others

शिक्षणाचे व्यापारीकरण

शिक्षणाचे व्यापारीकरण

1 min
475


विद्या, शिक्षण, ज्ञान, अध्ययन

अवजड शब्दांची ही मांदियाळी,

व्यापारीकरणाच्या नव्या युगात

गरिबांची मात्र रिकामी झोळी...


महागडी झाली शिक्षणपद्धती

कुठून आणावी इतकी रोकड?

विद्येचे रत्न जरी अमोलिक

सामान्यांची होते इथे धडपड...


मोजक्या पगारात आधीच त्रस्त

भरगच्च दान शिक्षण संस्थांना,

म्हणे, 'शिकल्याने होते प्रगती'

पण त्याचा भार काही पेलवेना...


घडा घडवण्या माती हवी शुद्ध

नको त्यात मिसळलेला लोभ,

फुटता तोच घडा उरते माती

शिकवणींचा उफाळतो प्रक्षोभ...


नका राबवू कोवळ्या हातांना

ज्ञानप्राप्तीसाठी हवे प्रोत्साहन,

भरारी घेण्या आकाशात उंच

आधी हवे पंखांचे सुनियोजन...


Rate this content
Log in