STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Others

4  

Priyanka Shinde Jagtap

Others

कान्हा हृदयी भरला

कान्हा हृदयी भरला

1 min
450

काव्यप्रकार - गवळण


हरले मी देहभान, कान्हा हृदयी भरला 

गवळण नको म्हणू, प्रिय सखी म्हण मला ॥धृ॥


कालिंदीच्या झोक्यावर

हिंदोळा हा आठवांचा,

निर्व्याज या प्रेमापायी

सोड नाद रुक्मिणीचा ॥१॥


देवकीच्या नंदलाला

नको काढू खोड अशी,

सुवासिक हा मोगरा 

माळ माझिया तू केशी ॥२॥


रासक्रीडा खेळावया

उतावीळ झाले आता,

छळते ही शर्मो-हया 

हात तुझा हाती येता ॥३॥

 

जरी सावळ्या रंगाचे

दिसे उठूनी कृष्णांग,

उगाच का मी राधिका

श्रीरंगात अशी दंग ॥४॥


कालियाला दिला शह

सारथ्य लाभले पार्था,

कधी देशील रे सख्या

भेटीची आनंद वार्ता ॥५॥


Rate this content
Log in