कधीतरी....!
कधीतरी....!
आजकाल
जो उठतो तो जीभ टाळ्याला लावतो
कुठल्याही संदर्भाशिवाय ....!
कुठलंही तारतम्य न बाळगता
तथ्यहीन वाचाळतो
यत्र , तत्र , सर्वत्र ....!
गिळंकृत करण्या शांततेला
बकासुराच्या असूरी भुकेसारखा
अधिपत्य स्थापण्यास ....!
पण कुठवर ....
कधीतरी ....
होईलच शेवट ....
असूरी दहशतीचा ....!
शांतता मात्र हसतेय कोपऱ्यात
गालातल्या गालात
समाधीस्त होऊन ....!!!!