STORYMIRROR

Vaibhav Coolkarni

Abstract

4  

Vaibhav Coolkarni

Abstract

तू सावळी रात्र

तू सावळी रात्र

1 min
467

तू सावळी रात्र

पौर्णिमेची...

तू त्या दिवसाइतकी

गोरी नाहीस,

याची खंत नको बाळगूस!

त्याचा गोरा रंग

हा भडकपणा आहे...

तुझा सावळा रंग

क्लासिक आहे...


तू अपराधभाव तर

अजिबात बाळगू नकोस!

तो देखणा असेलही,

पण तू सुंदर आहेस!

सत्य आणि शिवाइतकीच!

तो संगमरवरी ताजमहाल असेल;

पण तू हिमालय आहेस!


महितीय का?

असेल तो गोरागोमटा, सुंदर...

पण बाहेरून

तू आतून सुंदर आहेस!

म्हणूनच

पौर्णिमेच्या रात्री

नारळी पोफळी

शांत, स्तब्ध आणि गूढ दिसतात...


माझी हृदयातून आलेली गाज

लोकांना ऐकू येते

तेव्हा ते माझं आणि तुझं

नातं जोडतात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract