STORYMIRROR

Vaibhav Coolkarni

Romance

2  

Vaibhav Coolkarni

Romance

प्रेमाचं नाटक

प्रेमाचं नाटक

1 min
387

त्यानं माझ्यावर 

प्रेम असल्याचं 

नाटक केल्याचा

अपराध-

हा

स्वार्थी भावनेतून 

केलेला नसल्यामुळे

तो निरपराध आहे.

मला दुःख न देण्यासाठीचा

हा त्याचा खोटेपणा;

खोटेपणा कमी

मोठेपणाच जास्त आहे.

त्यालाही न कळलेलं

एक गुज सांगते.

हसू नको

तुला विनोद वाटेल,

पण हे वास्तव आहे.

माझ्यावरच्या प्रेमापोटीच

तो 

माझ्यावर

प्रेम असल्याचं

नाटक करतो.'


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance