STORYMIRROR

Vaibhav Coolkarni

Abstract

4  

Vaibhav Coolkarni

Abstract

तिचे सॉफ्ट व्हर्जन

तिचे सॉफ्ट व्हर्जन

1 min
332

कविते,

तू कधी

मंद्र सप्तकात गाणार

तर कधी 

तार सप्तकात जाणार

मला चकवा देऊन

तिथून पसार होणार

तिसर्‍याच सप्तकात!


माझी दमछाक होते

पाठशिवणी खेळताना

पण तुला आनंद होतो

मला तो विकृत वाटतो;

पण असू दे


मध्य सप्तकातून परागंदा झालेल्या तुला

शोधतच नाही मी

मग तू 

आकाशपाताळ एक करतेस

इकडे मग 

प्रलय येतो

तुझा षड्ज

तुझा गंधार

तुझा धैवत...

मला नाही कळत

खरंच! 


पण ते तुला छान दिसतात

तू तांडव करतेस

ते ही बघण्यासारखा असतो

तू भरकटत राहतेस

सगळ्या ब्रह्मांडभर

आत्ममग्न कुठली!

आणि मी काय तुझा प्रेक्षक?


मलाही मन आहे

मलाही अहम आहे

तुला काय गं!

आकाशगंगेत न्हाऊन आलीस,

की झालीस पापमुक्त!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract