STORYMIRROR

Vaibhav Coolkarni

Romance

4  

Vaibhav Coolkarni

Romance

बोलू आपण

बोलू आपण

2 mins
317

बोलू आपण 

आधी तुझं कपाट उघड

त्यातलं माझं पुस्तक काढ

त्यावरची धूळ झटक

एक नजर टाक

थोडाफार ओलावा शिल्लक असेल

तर तुला अक्षरं ब्लर दिसतील.

तू डोळे पूस

तुझ्या त्या कोरड्या रुमालानं

पाटी कोरी होऊदे

मग बोलू आपण


पुस्तक नसेल तिथं कदाचित.

रद्दीत गेलं असेल!

मग तू उलटी पावलं चालत

काही महिने मागं जा

तिथं विखरलेली

सोनचाफ्याची फुलं

अजूनही तुला सुगंध देतील.

ती निर्माल्य समजून

वाहत्या नदीत अर्पण कर

बघ तुझं धाडस होतंय का

मग बोलू आपण


तुझं धाडस होईल कदाचित 

मग तू पार्कात जा 

तिथे ओढ्याकाठच्या 

सुनसान कट्ट्यावर 

काही हसरे क्षण सांडलेले दिसतील 

ते तुला बघून विचारतील 

‘तो’ नाही आला?

त्यांना म्हण-

तुम्ही कोण लागता माझे?

त्यांचं उत्तर नीट ऐक 

मग बोलू आपण 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance