Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

anupriya deore

Abstract

3  

anupriya deore

Abstract

निरागस

निरागस

1 min
583


शब्दांशी खेळता खेळता

शब्दांनी उलगडले मज

चेहऱ्यावर ह्या

प्रकटले तेज  


भाव अनोखे, 

ओळखीचे झाले

ना पुसता कधी;

माझे झाले


रागीट मी

स्वाभिमानी मी

प्रेमळ मी 

कडक मी 


ओळख माझी, 

ह्या भावांपायी 

दबले मनात ह्या

तत्वापायी


शब्द शब्द जुळवत;

तया मी मांडिले 

समजत - उमजत;

मला घडविले


बीज कधी हे 

कोणी रोवले

अंकुर तयासी;

आता फुटले


ना जाहले परिपक्व

हे व्यक्तिमत्त्व अजुनी  

निरागसता दिसते कधी

आरश्यात पाहुनी 


ओळखले लोकांस

अनोळखी "मी" स्वतःस 

भासले जे त्यास  

भासले काही स्वतःस 


वेळ खर्चिला;

ओळख माझी कराया

रक्त आटवले;

जगात मिरवाया


विसरून गेलोच कसे 

अंश देवाचा

भावशून्य होऊन 

घेणार निरोप जगताचा 


सर्व भाव विरून

होणार मातीमोल 

कधी कळेल मज;

निरागसतेचे मोल???


Rate this content
Log in

More marathi poem from anupriya deore

Similar marathi poem from Abstract