STORYMIRROR

Mangesh Medhi

Abstract

4  

Mangesh Medhi

Abstract

आला तो आला

आला तो आला

1 min
304

तुषार ते उधळीत

अवखळ तो छेडीत

तप्त तनुस रिझवीत

विरहाग्नी शमवीत

आला, आला तो आला


मन मोर नाचवीत

चातकास तृप्तवीत

घनमीठीत घेत घेत

प्रेमामृत शिंपीत बरसत

आला, आला तो आला


प्रणयरस संगीत

रास रंग खेळीत

गोपीकेस भुलवीत

धीट वाट अडवीत

आला, आला तो आला


चुंबित भिजवीत

प्रियेसी नाचवीत

लगट तन झोंबीत

मोती मोती फुलवित

आला, आला तो आला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract