STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

4  

काव्य चकोर

Abstract

कागद आणि लेखणी

कागद आणि लेखणी

1 min
1.4K

तिच्या मौनाचा संवाद

त्याने केलाय आत्मसात

तिच्या ओघळणाऱ्या अश्रूस

त्याने सामावलंय हृदयात..!!


तिच्या सुखात दुःखात

निरंतर त्याची साथ

तिची प्रत्येक भावना

त्यानेच मांडली शब्दात..!!


सचैल नाहतो तो

तिच्या प्रेमाच्या प्रवाहात

विहंग विहरतो तो

तिच्या स्वप्नांच्या उत्तुंग आकाशात..!!


टंकार असतो तो

तिने उगारल्या आसुडाचा

झंकार होतो तोच

तिने गुंफलेल्या भावनांचा..!!


तिचा शब्द झेलायला

तो नेहमीच दिसतो तत्पर

नाभीतली कस्तुरी ती

तर तो दरवळणारे अत्तर..!!


युगायुगांची अनोखी त्यांची

निस्सीम प्रेमकहाणी

तो प्रियकर वेडा कागद

ती सुंदर प्रियतमा लेखणी..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract