STORYMIRROR

Eeshan Vaidya

Abstract

4  

Eeshan Vaidya

Abstract

तृप्त घरकुल

तृप्त घरकुल

1 min
256

एक सदाफली रतीपायी मासोळी घुंगूर

नादतल्लीन झालेला मास अवघा धुंदूर


तृप्त अमृताची पाख लुचणाऱ्याला लाभली

दूधभिजल्या ओठांची फूलकवळी पाकळी


इथे रंगावीन रंगे फक्त तरंग गांधार

इथे गंधावीन गंधे भावसुगंधी लकेर


फुटीतुटीच्या व्यथेला बोट लागे सौहार्दाचे

आसूरुसूंच्या वेलीला गुच्छ फुलते हास्याचे


माझी लेखनाची खोली मधे बाळाचा पाळणा

तारा तापल्यापल्याड तिथे धुंदला तराणा


पकावात शिजलेले नाही पक्वान्न नाजूक

एका भाजीभाकरीत चवी सामावल्या लाख


नाही अलीशान डौल, नाही शहाजादी ताठा

चोहोबाजूंनी धावत आल्या जिव्हाळ्याच्या वाटा


कधी असहाय झाला, अगतिक आला काळ

वाट तुमची पाहील माझे तृप्त घरकूल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract