STORYMIRROR

Eeshan Vaidya

Others

4  

Eeshan Vaidya

Others

पुळणपुरी

पुळणपुरी

1 min
371

वाळूच्या अंकावर

भीज येऊन निजे

चेतनमय जाग हळू

शंखशिंपल्यात सृजे


थरथरत्या झुळुकांचा

श्वासा या थंडावा

ओहटीच्या लाटांतून

जीवांचा येई थवा


मूक नामसंकीर्तन

गजबजली पुळणपुरी

काळाच्या ओंजळीत

जमलेले वारकरी


Rate this content
Log in