STORYMIRROR

Eeshan Vaidya

Others

4  

Eeshan Vaidya

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
291

परमहंस पावलांची माय मराठीची चाल

प्रसन्नता शिंपणारा शकुनाचा बोल,ताल


मराठीच्या संस्कारांनी गर्भातच घडे काया

रक्ती वाहे हळुवार ओवी-अभंगाची माया

जन्मताच इथे पडे गळा सात्त्विकाची माळ

प्रसान्नता शिंपणारा-------


सरस्वती ममतेने गाते अंगाईची गीते

देहातील मृत्तिकाही जितें बाळसे धरीते

सळसळत्या उत्साही चुंबी पांडित्याचे भाळ

प्रसन्नता शिंपणारा------


उभे ज्ञानाचे डोंगर आनंताशी संवादिती

माझ्या कुडीतून पेटे माय मराठीची ज्योती

जागरण घडवाया होते शाहिरी मशाल

प्रसन्नता शिंपणारा-----


घरातील जाते-जोते अंतर्मुख निरंतर

मराठीच्या पायतळा गीता वाचतो ईश्वर

ब्रह्मविद्येचा सुकाळ, तिने व्यापिले आभाळ

प्रसन्नता शिंपणारा----


Rate this content
Log in