चंद्रभागा
चंद्रभागा
1 min
207
गात्र पांगळून जाता होई मनही पांगुळे
परी विठूच्या ओढीने चालू लागली पाऊले
दिंडीतल्या गजराने भानावर येतायेता
दिसू लागल्या प्रकाशी उजळल्या पायवाटा
चालो लागली इंद्रिये पंथी निस्तरीत काटे
आणि गळून पडली अंतरीची जळमटे
राणा अलंकापुरीचा ज्याच्या पायी होतो लीन
झालो उतावीळ मीही त्याचे धराया चरण
राऊळाच्या गाभाऱ्यात भेटी होता जिवलगा
डोळ्यातून वाहो लागे पवित्रशी चंद्रभागा