मातीच्या संगती
मातीच्या संगती
1 min
368
तुम्हा आभाळ मोकळे
मुक्त अनुभवा हसू
पायरीच्या पत्थराचं
दुःख उगा नका निसू
पायठोकरा खाताना
लागे अंगारा कपाळी
नाही विटाळ -चांडाळ
नाही डसत विरोळी
वावटळीची भीतीही
नाही मनाला शिवत
वावदूक विचाराने
नाही माथे भिरडत
तो तो मातीच्या संगती
सुखी आहे लगटून
त्याच्या चोख भक्तीमध्ये
विठू जाय विर्घळून