थेंब
थेंब
1 min
200
व्हावे आकाश सागर
स्वप्न नव्हतेच मुळी
झालो थेंब उगमाचा
डोंगराचा आहे ऋणी
नाही लाटांचे तडाखे
नाही वादळाचे भय
सांडताना कुशीतून
अंगभर होते लय
पुरे आकाश मोकळे
माझ्यामध्ये डोकावते
थेंबाथेंबांनी जडते
माझे सागराशी नाते
इवलासा जीव माझा
असा मोठामोठा होतो
त्याच्या इवल्या रूपात
ब्रह्मांडाचा लोप होतो
