Eeshan Vaidya

Tragedy

2  

Eeshan Vaidya

Tragedy

चित्र आजचे

चित्र आजचे

1 min
476


कांदळवनिची वीण कीटकी

कर्दमात या वाढत आहे

गोंडवळाचा गुंता पात्री

जीवन सारे झाकत आहे


खोल खोल गेलेले पाणी,

ढिगार-कचरा दुर्गंधाचा

तोच रवंथी गायमुखाने

जीव घेतसे जित्राबाचा


चंद्र फिका पडलेला आहे

सूर्य उग्र तापतो डोइला

आभाळाला पडली छिद्रे

ठिगळ कोण लावील तयाला?


प्रगल्भतेला सत्ताकांक्षी

कुरघोडीचे स्वप्न पडावे !

मर्मभेद करताना आपुल्या

संस्कृतिचेही सत्त्व विकावे ?


वस्त्रहरण नित्याचे आहे

स्वस्त जाहले मरण त्याहुनी

गुरगुटल्या भाताची थाळी

हाती यांच्या देइल कोणी ?


दृष्टी झाकुन 'सुखात आहो'

म्हणणे ही तर आत्मवंचना

वेशीवरती हीच लक्तरे

टांगाया कुणितरी हवे ना ?


Rate this content
Log in