STORYMIRROR

Eeshan Vaidya

Others

3  

Eeshan Vaidya

Others

चित्र कालचे

चित्र कालचे

1 min
265


आभाळाची अमृमाया

रानवनांना भिजवत होती

खळाळपात्रामधुन नितळता

मुक्तपणाने वाहत होती


टच्च टपोरा कणीसदाणा

उभी शिवारे पिकवित होती

पोटभरीचा घास त्यातुनी

खिलारवाडे वेचत होती


झगझगत्या किरणांतुन वारा

प्राण जागवित विहरत होता

उसगोडवा माणुसकीचा

पुरे बाळसे धरून होता


कालचक्र फिरणारे गरगर

नियमगतीचे बांधिल होते

वृक्षवेलिच्या पानांमधुनी

केतकचांदण निथळत होते


'सहनाववतू 'चे वास्तव

संस्कृतीत भरलेले होते

उभे ताठ ज्ञानाचे डोंगर

पिढ्यापिढ्यांना घडवित होते


Rate this content
Log in