सद्भाग्य हे कुणाला?
सद्भाग्य हे कुणाला?
1 min
347
वेडात मी जगावे अभिशाप लाभलेला
वरदान हेच आहे समजावतो मनाला
कुठल्या कुळात आलो, पडलो जनात कुठल्या
सौभाग्य हेच आहे, जगतो ऋणात इथल्या
ग्रहणात दान द्यावे शिकवावया हवे का?
ते तेच करत आलो नेऊन उंच झोका
झोक्यात भान आहे, आहे अधांतरी मी
हातात जे न आले सोडून ते दिले मी
पाताळ लांब खाली, वर स्वर्ग दूर खूप
मधल्यामध्ये परंतु इहलोक हा सुरूप
वेडेपणा शहाणा-जाणीव लाभलेला
शापात वर मिळावा सद्भाग्य हे कुणाला?
