STORYMIRROR

Neeraj Shelke

Abstract

3  

Neeraj Shelke

Abstract

प्रेमाचा खेळ

प्रेमाचा खेळ

1 min
221

कविता करणं नसतं कोणा येड्या गबाळ्याच़ काम , 

इथं त्यांचीच कविता जास्तं चालते ज्यांच्या प्रेमांन केलाय त्यांना राम राम !! 


एक सोडून गेली म्हणून रात्रंरात्रंभर बिचारे रडत बसतात, 

लिखाणातून मग त्यांच्या कवितांच्या नद्या वहात असतात !! 


झरेही वाहतील खळखळ करत इतकं असतं त्यांनी डोळयांत पाणी साठवलेल , 

एक एक शब्दं लिहिताना त्यांनी असतं त्यांच्या प्रेयसीला आठवलेल !! 


अचानकपणे मग डोळ्यांतून त्यांच्या अश्रुंचा पूरच येऊन जातो , 

शब्दं न शब्दं त्यांचा काळजावर खोलवर वारच़ करून जातो !! 


पण टिकतात तेच कवी जे लिहून सारं विसरून जातात , 

पुन्हा एकदा दुसरीच्या प्रेमांत पाय घसरून जातात !! 


पुन्हा नव्याने सुरू होतो मग त्यांच्या प्रेमाचा नवा खेळ , 

अन जमलं तर जमतं नाहीतर पुन्हा होते आयुष्याची भेळ !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract