STORYMIRROR

Neeraj Shelke

Tragedy Inspirational

4  

Neeraj Shelke

Tragedy Inspirational

लढ म्हणा

लढ म्हणा

1 min
270

वाहून गेलं सारं काही 

जवळ काहीच उरलं नाही 

डोळ्यांदेखत झाली राख रांगोळी 

तरीही डोळ्यांत अश्रू नाही, 


पावसाच्या या पुरामुळे आमचा 

पडून गेला वाडा जुना 

जगण्याचा प्रयत्न करतोय देवा 

तुम्ही फ़क्त लढ म्हणा! 


कारभारीण माझी एकलीच 

वाड्यासाठी लय खपली होती 

वाड्यातली नाती तिनं 

जिवापाड जपली होती, 


वाहून गेलं आमचं बाळ

पण रडलो नाही पुन्हा पुन्हा 

जगण्याचा प्रयत्न करतोय देवा 

तुम्ही फक्त लढ म्हणा! 


मायेसाठी कारभारणीनं 

नवी साडी आणली होती 

पण त्या नव्या साडीसंग 

माय माझी वाहिली होती, 


दुःख खूप झालं तेव्हा 

पण इतका काय झाला आमचा गुन्हा 

जगण्याचा प्रयत्न करतोय देवा 

तुम्ही फक्त लढ म्हणा!


सकाळ अन् संध्याकाळ 

तुझंच नाव असायचं मुखी 

तरीपण तुझ्या या भक्ताला 

का केलंस रे तू दुःखी? 


काहीच नसताना जवळ आता 

सारं काही वाटतंय सुना सुना 

जगण्याचा प्रयत्न करतोय देवा 

तुम्ही फक्त लढ म्हणा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy