Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neeraj Shelke

Inspirational

3  

Neeraj Shelke

Inspirational

माणूस म्हणून जगताना

माणूस म्हणून जगताना

1 min
325


जन्म आणि मृत्यू हा तर 

आयुष्याचा असतो भाग , 

ज्याचा त्याचा असतो प्रश्न 

कुणाशी करावं प्रेम अन् राग !!


माणूस म्हणून जगताना 

माणुसकी सोडू नये , 

विचारात असेल जरी दुरावा 

पण कुणाचे मन मोडू नये !!


गरजूना करावी मदत 

एकमेकांना द्यावी साथ , 

प्रेमानं रहावं साऱ्यांशी 

घालूनी हाती हात !!


आली किती संकट तरी 

मनानं खंबीर रहायचं असतं , 

संकटांना तोंड देताना 

मुळीच घाबरायचं नसतं !!


माणूस म्हणून जगताना 

ठेवावे उच्च विचार , 

प्रेम द्यावं प्रेम घ्यावं 

बंधू-भाव मनी आचार !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational