प्रिय अमुचा महाराष्ट्र देश
प्रिय अमुचा महाराष्ट्र देश
कुठली रिया,
कुठली कंगना,
कुठे हरवली सुशांतची केस ,
कोरोनाला पळवता पळवता
साऱ्यांच्या तोंडाला यायला फेस !!
कोणी उठत
पळत सुटत
आपल्या राज्याची ओलांडून वेस ,
जातीधर्मावर लढवणारे म्हणतात
भारत आहे आमचा देश !!
आधी मुंबई
मग महाराष्ट्र
सारेजण करतात इथेच निवेश ,
अन् राज्याची तुलना पाकशी करून
म्हणतात आता काय राहील इथं शेष !!
आमची मुंबई आमचा महाराष्ट्र
तुम्ही नावं ठेवणारे कोण?
उपऱ्यासारखे येता अन् नावं ठेवून जाता
उपरेचं ते शेवटी, तुमचं काय करणार आता?
ध्यानात ठेवा
गाठ मारून
तुम्ही किती ओलांडली तुमच्या पात्रतेची वेस ,
प्रिय होता, प्रिय आहे अन् प्रियचं राहिलं
अमुचा हा एक महाराष्ट्र देश !!