Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Neeraj Shelke

Inspirational

3  

Neeraj Shelke

Inspirational

कँडल मार्च

कँडल मार्च

1 min
211


केली असती मीही कविता 

लिहिलीसुद्धा असती कथा , 

पण अफाट दुःख सोसणाऱ्या 

ताईची कशी मांडली असती व्यथा !!


आपणच सारे निलाजरे 

काहीच नाही कामाचे , 

झाला एखादा बलात्कार की 

राहतो उभे मेणबत्या घेऊन बिनकामाचे !!


अशा नराधमांना आपण 

का नाही देऊ शकत शिक्षा ? 

का स्त्रियांना रक्षणासाठी 

सतत मागावी लागते भिक्षा ? 


कधी थांबणार हे सगळं 

असे लचके तोडण्याचं काम ? 

कधी मिळणार स्त्रियांना 

वासनेच्या विळख्यातून आराम ? 


अजून किती बलात्कार आपण 

असे उघड्या डोळ्यांनी पहायचे ? 

की काहीच नाही करता येत म्हणून 

फक्त कँडल मार्च काढत रहायचे ? 


Rate this content
Log in