अंतरीचे भाव
अंतरीचे भाव
गेलीस सोडून मजला तू
उधळून टाकलास डाव ,
नाही कळले कधी तुला
माझ्या अंतरीचे भाव !!
लोकांनी कान भरले तुझे
बदनाम केलं माझं नाव ,
इज्जत काढली घराण्याची
गावातून हाकलून लावलं राव !!
प्रेम होतं खरंच़ माझं
कुठलाच़ नव्हता तो बनाव ,
किती त्रागा झाला मजला
पाहिलेसही नाही हावभाव !!
मला कधीच नव्हती गं
तुझ्या शरीराची हावं ,
माझं फक्त इतकंच होतं
की तुझं प्रेम मला मिळावं !!
म्हणूनच़ म्हंटल आज तुझ्या
विरहात मी कविता रचावं ,
कारण नाहीच़ कळले कधी तुला
माझ्या अंतरीचे भाव !!