Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Neeraj Shelke

Romance

4  

Neeraj Shelke

Romance

जीवनात ही घडी अशीच राहू दे

जीवनात ही घडी अशीच राहू दे

1 min
268


माझ्या मैत्रीतले प्रेम तीला पाहू दे , 

जीवनात ही घडी अशीच राहू दे !! 


राहून जातील काही क्षण आठवणींनी भिजलेले , 

तरळून जातील अश्रु असतील जरी नयन निजलेले , 

त्या निजलेल्या नयनातून स्वप्नांना पाहू दे , 

जीवनात ही घडी अशीच राहू दे !! 


आठवण येता तुझी मन हे माझे मोहरून गेलेले , 

आठवण तुझी मनाला वाट पाहती नयन थकलेले , 

मैत्रीत तुझ्या मला रंगूनी जाऊ दे , 

जीवनात ही घडी अशीच राहू दे !! 


आठवू दे मनाला आपले ते प्रेमाचे क्षण मंतरलेले , 

कळू दे साऱ्यांना मैत्रीचे नाते आपले प्रेमांत साध्य झालेले , 

प्रेमाचे तुझ्या नी माझ्या लोकांना गुणगान गाऊ दे , 

जीवनात ही घडी अशीच राहू दे !! 


Rate this content
Log in