Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nilesh Parhate

Tragedy Crime

4.0  

Nilesh Parhate

Tragedy Crime

"निर्भया "

"निर्भया "

1 min
11.7K


पोरकं केलंस आम्हाला पोरी

मायेची कूस तू सोडून गेलीस

"आदिशक्ती" म्हणून पूजलं तुला

काळजाचा लचका तोडून गेलीस


रानटी श्वापदांच्या तावडीत सापडून

दिलास तू स्त्रीत्वाचा बळी...

मरणप्राय यातनांचा घनघोर कल्लोळ

जनमानसात उडवून गेलीस...


त्यागलं तुझ्या पवित्र आत्म्याने

राखरांगोळी झालेल्या नश्वर शरीराला

पाशवी नजरांना बळी पडून

सोडलंस तू मलिन झालेल्या देहाला


मृत्युच्या दाढेतून वाचल्यावर तुला

जगूनही समाजानं जगू दिलं नसतं

दुटप्पीपणानं भरलेल्या या जगानं

तुलाच दोषी ठरवलं असतं...


बलिदान केलंस त्या पवित्र देहाचं

ज्यावर होत्या वखवखत्या नजरा

घोर आहे जिवाला आता...

कधी न होवो कुणी बळीचा बकरा


झालीस मुक्त एकदाची बाई

आली थोर पुण्याई पूर्वजन्मीची कामी

आहेत आमच्या सग्यासोयऱ्या

किती करावी काळजी त्यांची आम्ही


जगण्यातलं जगणं संपलय आता

करतोय प्रार्थना कुणी बळी न ठरण्याची

सुटत नाही तरी अंधुकशी आशा

भाग्य कधीतरी उजळण्याची...


ठेवलंस पाणी डोळ्यात त्यांच्या

पहिली स्वप्नं ज्यांनी उज्ज्वल भविष्याची

विझली जरी "ज्योती" एका पणतीची

पेटवलीस तरी तू मशाल संघर्षाची...


वाट पाहतोय दिवसाची त्या

नरपशु जेव्हा " माणूस" बनतील

येईल तो शुभदिन लवकरच जेव्हा

आमच्या आयाबहिणी मुक्तपणे फिरतील…


Rate this content
Log in