Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nilesh Parhate

Romance

4.6  

Nilesh Parhate

Romance

पाऊसप्रेम

पाऊसप्रेम

2 mins
120


विजांचा खेळ करत धावत आलेला पाऊस

खट्याळ मनाला उधाण वारा आणतो

अन् वातावरणात धुंद गारवा आणून

सगळ्या दगदगीतून मोकळा श्वास देतो


कोवळ्या झुळुकेने पानही तरारून जातात

वाराही फिरवतो दवंडी पावसाच्या गाण्याची

थेंब मोत्यांचे झेलत गंधाळून जाते ही माती

अन् मग वाढत जाते शान साऱ्या शिवाराची


जगाच्या पोशिंद्याला लागते तुझीच आस

अन् मग तूही बरसतोस काळ्या मातीवर खास

बळीराजाच्या घामाच्या धारेसमोर तू ही लाजतो

अन् मग ठेवून जातो भरल्या पिकांची आरास


बळीराजाच्या शेतापासून हिमालयापर्यंत

सगळीकडे पाऊस नामाचेच गावे चिंतन

मनालाही चिंब भिजवून टाकणारा पाऊस

मग घेतो प्रेयसीच्या गालांचंही चुंबन


कुठे कोसळतो तो मुसळधार

तर कोठे दुष्काळाच्या पाऊलखुणा

कोठे आणतो तो महापूर तर

कोठे पिण्याच्या पाण्याची भ्रांत म्हणा


कधी होतो रस्त्यांवरची चिकचिक,

तर कधी लहान मुलांच्या होड्यांचं कारण

कोठे छतातून गळणारी टीप टीप,

तर कधी छत्रीविना फजितीला आमंत्रण


तापलेल्या रानावर बेभान बरसून

आसुसलेल्या धरणीला चिंब भिजवतो

अन् धरतीचा हा हिरवा शृंगार बघत

रापलेल्या मनावरही बेधुंद कोसळतो


पावसाची होते कधी रिमझिम

तर कधी करतो गडगडाट

आपल्या जणू आठवणीही अशाच

करतात कधी कधी फडफडाट


ही ओली सुगंधी माती

मन ओली करून जाते

अन् काळजावरची काजळी

पाण्यासोबत अलगद वाहून नेते


मनाच्या कणाकणावर आदळणारा पाऊस

फिरतोय मृद्गंधाच्या लाटा घेऊन

वळीवाचा असो की श्रावण सरींचा

जातो मग सर्वांग चिंब चिंब भिजवून


पाऊस घेऊन येतो सोबत

कधी भावनांचा धुराळा

जुन्या आठवणींची ही शिदोरी

पाऊस प्रेमाचा हा थाटच निराळा


आभाळासारखं मनही भरून आलंय आज

आभाळ होईल रिकामं पावासाच्या थेंबाद्वारा

अबोल असूनही खूप काही बोलून जातो पाऊस

अन् मनातील पाझरही वाहतो अश्रूंच्या धारा


आजही मन करतं विचार की

बरसू द्यावं का असंच पावसाला

की घालावा बांध आठवणींच्या सरींना

अन् आवरावं या बेधुंद मनाला


म्हणतात आजकाल इथं सगळे

पाऊस पहिल्यासारखा पडत नाही

कोसळला जरी मुसळधार कुठे

तरी ओलावा तो उरलाच नाही


पावसात भिजून आपणही

कधी पाऊस होऊन जावं

जरी आपण राहिलोच कोरडे

तरी मात्र पाण्यासारखं वाहावं


ओल्या मातीचा गंध हुंगून

मीही पटकन ओळखले

हे थेंब म्हणजे सखे तूच

जणू विरहाचे निरोप तू धाडले


अचानक पाऊस आल्यावर

काही थेंब तिच्या ओठांवर विसावले

क्षणभर मी तिकडे पाहतच राहिलो

मग मलाही एकदा थेंब व्हावेसे वाटले


बेधुंद करणाऱ्या पावसात प्रेमीयुगुलांचा खेळ

आणि मग उडतो प्रणयाचा बेभान हा वारा

मंतरलेल्या खट्याळ देहावर बरसत

उडू लागतात मिलनतृप्तीच्या गारा


ओल्या प्रेयसीच्या त्या स्पर्शाला,

धुंद मंद असा सुवास आहे,

आजही कोसळतोय तोच पाऊस,

ज्यात माझा अडकलेला श्वास आहे


Rate this content
Log in