Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr Anjushree Metkar

Crime

3  

Dr Anjushree Metkar

Crime

आक्रोश गहिवरला

आक्रोश गहिवरला

1 min
401


असा मी काय गुन्हा केला?

बळजोरीच्या प्रितीला

नकार मी दिधला

ध्यास होता मनी

व्हावे उतराई कष्टुनी

मायबाप बंधू कारणी

कुटूंबियास आधारूनि।।


मी नारी न अबला

ओळखीने घात केला

भ्याडा तू नकार ना पचविला

छलकपटे गळा कापला।।


हिंगणघाट ते स्मशानघाट 

का केलीस वाताहत?

तव दुष्कृत्यांचा हा घट

हाय, कधी फुटेल का जनक्षोभात?


पेटत्या ज्वालांच्या वलयात केले मी मृत्यूशी दोन हात

कणरवाने झिजल्या पिंडास 

अखेर त्यजिले मी या देहास।।


नराधमा तुझी न आता खैर

आप्तस्वकीय होवोत तुज गैर

फरपटोनी फेकतील का तुज भक्ष्यस्थानी वैश्वानर? 


मग संपेल का तव क्रौर्य धैर्य?

चितेवरील मम कायेच्या अंगारे 

पेटतील का जनक्षोभ निखारे?

तुजसम महिषासुरा वधतील ते दबंग

तव दुष्कृत्यांचा जळेल मग दंभ।।


आतुरले मी त्या क्षणा

तव पापकृत्यांचा दणदणा

विरतील तव खाणाखुणा

मिळेल चिर:शांती या मना।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime