STORYMIRROR

Pradnya Labade-Bhawar

Tragedy Crime

4  

Pradnya Labade-Bhawar

Tragedy Crime

शिक्कामोर्तब

शिक्कामोर्तब

1 min
23.6K

रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली ती

सोबतीला प्रचंड वेदना आणि विव्हळणारे घाव

आणि मन मात्र भूतकाळाच्या आठवणीत 


का? तर,


आज तिला आठवत होतं 

कोवळ्या वयात लाडीगोडीने शेजारच्या काकाचे अंगणात खेळायला बोलावणं 

आणि अनामिक स्पर्शाने घेतलेले गालाचे चुंबन


आज तिला आठवत होतं

कॉलेजला त्यांचं कधी दाताने स्वतःचेच ओठ दाबणं तर कधी जिभ स्वतःच्या ओठांवर फिरवून लज्जा उत्पन्न करणं

आणि असेच असंख्य चौकाचौकात बसलेले किळसवाणे चेहरे...


आज तिला आठवत होतं 

कामाच्या ठिकाणी कौतुक झाल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट 

आणि त्यातून 'पदर पाडला असणार बाईंनी' अशी अहंकारी पुरुषांच्या घोळक्यातून येणारी अश्लील कुजबूज 


आज तिला आठवत होतं 

रात्री घरी उशिरा आल्यावर कॉलनीतील साठीतील आजोबांचे तिला अतृप्त न्याहाळणं

आणि त्यांच्या डोळ्यात दिसणारी तिची ती नग्न प्रतिमा 


आज तिचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते 

परंतु, मन मात्र इतरांच्या वासनेच्या भावनेत हरवलेल्या तिला शोधत होते 


कारण मनावर तर तिच्या पावलो-पावली बलात्कार झाले होते 


फक्त त्यातील काही प्रतिनिधींनी तिच्या शरीरावर आज त्याचे शिक्कामोर्तब केले होते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy