STORYMIRROR

Pradnya Labade-Bhawar

Inspirational

3  

Pradnya Labade-Bhawar

Inspirational

जबाबदारी

जबाबदारी

1 min
11.9K

एक दिवस अचानक हृदयावर आघात होतो 

आणि हृदय छिन्नविछिन्न होऊन त्याचे तुकडे चहुबाजू पसरतात...


तेव्हा जगण्याची किंचितही इच्छा उरत नाही 

परंतु तेव्हाच जबाबदारी डोकं वर काढते आणि विचारते "माझं काय?" 


त्याच जबाबदारीसाठी मग सर्व दुःख बाजूला सारून उभं राहावं लागतं...

वेचावे लागतात हृदयाचे तुकडे एकेक करून...


तेव्हा काही जण मदतीला येतात अन सावरु लागतात हृदयाला...

तर काहीजण तुकडेसुद्धा पायदळी तुडवत असहनीय दुःख देत असतात 


परंतु तरीही आपण हरायचं नसतं

जे सोबत आहेत त्यांना घेऊन पुढे चालायचं असतं


जबाबदारीची जाण ठेवायची आणि जगायचं आपल्या हृदयासाठी 

हृदयात असणाऱ्या माणसांसाठी 

आणि त्या माणसांच्या आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीसाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational