असावं कुणीतरी
असावं कुणीतरी
1 min
24K
कुणीतरी असावं आरशासारखं आयुष्यात
दिसावे आपले प्रतिबिंब हुबेहुब त्याच्यात
बघताच त्याने टिपावी गालावरील लाली
अन ओळखावा लटकेच नाकावरील राग
जाणावे अर्थ ओठापर्यंत अडलेल्या शब्दांचे
अन घालावी साद मनात दडलेल्या हाकेला
वाचावे गार्हाने डोळ्यातल्या अश्रुंचे
अन समजावी यातना त्या वरवरच्या हास्याची
नजरेतल्या भावना त्याने अलगद उचलाव्या
अन द्यावा एक खांदा त्यांना व्यक्त व्हायला.
