गरुडझेप
गरुडझेप
कधीतरी वाटतं गरुडझेप घ्यावी अन उंच उडावं,
अखंड आसमंत भेदुन फक्त स्वत:साठीच जगावं,
दुर क्षितिजापल्याड फक्त माझच घर बांधावं,
पण तिथे माझी पिलं नसणार ना. . .
मग काय, माझं हे स्वप्न इथेच थांबवावं.
सुखाचं आसमान पिलांसाठी मोकळं करावं,
गरुडझेप घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ भरावं,
झेप घेउन पिलं त्यांची स्वप्न जगतील,
मोठ्या ह्या आकाशात स्वच्छंद बागडतील.
मग माझीही स्वप्न त्याच्याच स्वप्नात असतील की.
पण त्यांना ती दिसतील, निदान आठवतील?
माहित नाही!!!!
परंतु मी मात्र कायम त्यांना बघेल,
कारण शरीररुपी पत्नी,सुन,मुलगी
इथे असेल मात्र ही आई आशिर्वादरुपी
कायम पिलांसोबतच उडेल.
