STORYMIRROR

Pradnya Labade-Bhawar

Others

3  

Pradnya Labade-Bhawar

Others

सांग ना रे मना

सांग ना रे मना

1 min
177

सांग ना रे मना, तुझा काहीच लागेना थांगपत्ता

का कोणास ठाऊक पण हल्ली अल्लड झालाय पुरता

घ्यावी का एकदा भेट निवांत आणि काढावी तुझी सगळी गुपितं

 सांग ना रे हीच का तुझी माझी आयुष्यभराची प्रीत?

अरे माझाच ना रे तू, मग कशासाठी हा लपंडाव?

सांग ना रे मना कशासाठी आणतोस असा परकेपणाचा आव

 कधी रुसतोस, कधी हसतोस, कधी चिडतोस तर कधी समजावतोस

परंतु शेवटी तुटल्यावर माझ्याजवळच तर येऊन रडतोस

 मना, खोल ना रे दरवाजे सारे होऊदे निखळ मैत्री

तुला ओळखण्याची मलाही देणारे फक्त एक संधी

अबोला आपल्यातला आता तरी मिटुदे,

नाहीतर एकदाचा हा जीवनाचा सारीपाटच संपू दे

वाऱ्यापरी उडतोस, पावसापरी बरसतोस

नशीबही बदलत नाही रे असा क्षणा-क्षणाला बदलतोस

मना, कधी तरी राह ना रे स्थिर आणि घेऊ दे तुझा ठाव

तुझ्या अशा वागण्याने होताहेत तुझ्यावरच ना रे असंख्य घाव.


Rate this content
Log in