कधीकधी
कधीकधी
1 min
24.1K
एवढही सोपं नसतं,
मन आपलं शब्दात विणुन कागदावर उतरवणं
कधीकधी,
कोरावं लागतं काळीज अन पाहावे लागतात असंख्य भावनांचे अर्थ
कधीकधी,
खोदावं लागतं स्वतःलाच अन शेंदाव्या लागतात असंख्य गोड कडू आठवणी
कधीकधी,
बहरावं लागतं, सुकावं लागतं
फुलावं लागतं ,मिटावं लागतं
पेटावं लागतं तर कधी विझावंही लागतं
शब्दांची गुंफण करण्यासाठी,
कधीकधी, स्वतःचीच झगडावं लागतं
तर कधीकधी परक्यांशी जोडावं लागतं.
तेव्हा तयार होतं,
एक काव्य
अगदी मनासारखं. . . .
