STORYMIRROR

Pradnya Labade-Bhawar

Others

3  

Pradnya Labade-Bhawar

Others

लेक मोठी झाली

लेक मोठी झाली

1 min
11.6K

लेक मोठी झाली.

वेण्यांनी बांधलेले केस आज वाऱ्यासोबत उडत आहे, नाजूक ओठ लिपस्टिकच्या रंगाने रंगत आहे, 


पायापर्यंत असलेले स्कर्ट गुडघ्यापर्यंत आलं आहे. 

नेहमी दाताने कुरतडलेली नखे नेलआर्ट ने सजत आहे.


काजळ घातलेले टपोरे डोळे नव्या दुनियेत रंगलेत,

कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी आज तिने तिचे पंखही सरसावलेत. 

मेकअपचा कंटाळा येतो म्हणून बाहेर जाण्याचं टाळणारी

ती आज स्वतःलाच तासभर आरशात न्याहाळत आहे.


 आणि मी मात्र काळजीने ग्रासले आहे. 


पण ही काळजी झटकावीच लागेल. 

लेकीच्या पंखाला बळ द्यावेच लागेल. 


शाळेच्या सुरक्षित भिंती सोडून लेकीला नव्या जगात धाडावेच लागेल. 

तिच्या या नव्या प्रवासात तिला समजून घेऊन तिची सखी व्हावच लागेल.


Rate this content
Log in