स्त्रीभ्रूण हत्या
स्त्रीभ्रूण हत्या
मुलगी असो वा मुलगा, गर्भात तर ते आईचं बाळ असतं,
पण 'तिची' हत्या करताना आईचं हृदय रडत असतं.
आयुष्यभर पैसा कमवायला जीवाचं रान केलेलं असतं,
पोटी जन्माला येणार्या लक्ष्मी ला मात्र लाथाडलेलं असतं.
जय भवानी जय शिवराय छाती ठोक पणे म्हणायचं असतं,
जन्माला येणार्या भवानी वर तलवारीने वार करून गर्भातच संपवलेलं असतं.
ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्या साठी छत्रपती शिवरायांना प्रेरणा दिली
त्याच जिजाऊच्या लेकीला गर्भात संपवलेलं असतं,
सावित्रीबाईंचा वारसा पुढे न्यायला आता कोणी उरलेलं नसतं.
मुलाला लग्नाला मुलगी नाही भेटत म्हणून सून शोधायला उंबरठ्याचं झिजवणं होत असतं,
पोटच्या मुलीच
ा जीव घेऊन मात्र मुलाचा संसार थाटण्याचं आई बाबाचं स्वप्न असतं.
मुलगी होती म्हणून गर्भपात केलेलं असतं,
म्हातारपणात मुलाने घरा बाहेर काढलं म्हणून आई बाबाचं काळीज हुंदका देत रडत असतं.
वृद्धाश्रमात मुलगा ठेवतो तेव्हा आई बाबाचं मन तडफडत जगत असतं,
"मुलगी असती तर सांभाळलं असतं" म्हणत मुलगा भेटायला येईल याची वाट बघत रोज मन मरत असतं.