Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

मधुराणी थळे

Tragedy Others

3  

मधुराणी थळे

Tragedy Others

व्यसन

व्यसन

1 min
12.1K


जेव्हा दुनिया तुम्हाला एकटं सोडेल,

तेव्हा त्या सिगरेट च्या धुरात आयुष्य दिसू लागेल.

दारू नी भरलेला ग्लास खूप काही दुरावलेलं असताना

जवळ सगळं असल्याचा भास करून देत आयुष्य जगायला शिकवेल.

आणि तुम्ही कुणा साठी यांना सोडाल?

त्यांच्या साठी जे तुमची साथ सोडताना

तुमचा जळून पडलेल्या सिगरेटच्या राखेएवढा ही विचार नाही करणार.

कि पुन्हा तुम्ही त्या नशेत तुमचं हरवलेलं आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करणार. 

दुनियेला तर फक्त दारूनी भरलेला ग्लास दिसेल, सिगरेटचा धूर दिसेल. 

पण या मार्गाला तुम्हाला जे दुःख घेऊन गेलं ते अदृश्य असेल.

खूप सोप्पं असतं दारू सिगरेट सोड सांगायला! 

पण ती व्यक्ती त्याच्या आहारी का गेली ते कठिण असतं दुःख जाणून घ्यायला.

कँसर होऊन मराल,लिवर खराब होईल असं जग सतत खुणावत असतं.

पण कँसर नाही झाला तरी मरण तर तसं पण येणार असतं

इथं खराब झालेल्या हृदयाचं कोणाला काय पडलेलं नसतं!

पण कोणाच्या तरी आठवणीत, दुःखात मरण्यापेक्षा कँसर नी मरण्यात काय वाईट असतं ?

जी दारू सिगरेट सोडायला सांगितलेली असते

त्याच सिगरेटच्या धुरात गुरफटून आणि

दारूच्या नशेत हरवून दारूच्या भरलेल्या ग्लासासारखं आयुष्य रेटत असतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy