प्रिय कागदा
प्रिय कागदा
तुला आग लावली,
तू पेटला,
तुला चटके बसले,
तू जळाला,
तुझी राख झाली,
का प्रत्येक वेळेस तू जळायचं?
का प्रत्येक वेळेस तू राख व्हायचं?
कधी प्रियकर-प्रेयसीच्या पत्रात जळून,
तर कधी चूल पेटवायची म्हणून?
आधीच इतके ओरखडे सहन करतो,
कधी फाटतो तर कधी फाडला जातो
स्वतःचा किती त्याग करशील दुसऱ्यांसाठी?
मलापण शिकवशील हा त्याग देहाची राख होण्याआधी जगण्यासाठी?
